Rain Alert: राज्यात पावसाचा जोर ओसरणार! पुढील पाच दिवस ‘या’ ठिकाणी अलर्ट 

पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

0
Rain Alert
Rain Alert

Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकण घाटमाथ्यावर सध्या जोरदार पाऊस सुरु असून मध्य महाराष्ट्रात पावसाने कहर केल्याचे चित्र दिसत आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक मंदिरे गोदावरी पात्रात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

नक्की वाचा : ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

दक्षिण गुजरातपासून केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला होता. सध्या मध्य प्रदेश, राजस्थानच्याजवळ हा कमी दाबाचा पट्टा सरकल्याने येत्या काही दिवसात कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही पहा: नगरच्या वाघिणीने वायनाड मध्ये उभारला पूल!

पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Alert)

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला तरी पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर  विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here