The issue of compensation : संगमनेर: मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात उपस्थित केला. सुरत–चेन्नई महामार्ग प्रकल्पासाठी जमीन नोंदवून घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत योग्य मोबदला (The issue of compensation) मिळालेला नसल्याने प्रभावित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार खताळ यांनी सांगितले की, सुरत–चेन्नई महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी सन २०२१ मध्ये संगमनेर मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनींच्या उताऱ्यावर थेट नोंदी करण्यात आल्या. या नोंदींमुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आल्या. मात्र, तीन वर्षांहून अधिक काळ लोटूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला (The issue of compensation) मिळालेला नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत (In financial trouble) सापडले असून त्यांच्या कुटुंबांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे आमदार खताळ यांनी सभागृहात नमूद केले. जमीन नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य वेळी मोबदला मिळणे आवश्यक असताना अद्यापही तो मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अवश्य वाचा- आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
तातडीने निर्णय घेऊन प्रभावित शेतकऱ्यांना न्याय द्यावा (The issue of compensation)
त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मोबदला देण्याची कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी आमदार खताळ यांनी अधिवेशनात केली. सुरत–चेन्नई महामार्ग प्रकल्प हा राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे वाहतूक सुलभ होणार असली तरी त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर भरपाई मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन प्रभावित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.



