Weather Update:राज्यात थंडीचा पारा वाढणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

0
Weather Update:राज्यात थंडीचा पारा वाढणार;पंजाबवराव डख यांचा अंदाज
Weather Update:राज्यात थंडीचा पारा वाढणार;पंजाबवराव डख यांचा अंदाज

Weather Update : राज्यातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदलत आहे. काही ठिकाणी थंडीचा कडाका तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान,राज्यातील काही भागात थंडीचा (Cold) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. त्यातच पुढील पाच दिवस राज्यात कसं हवामान असेल,याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार,आजपासून राज्यात जवळपास १४ डिसेंबरपर्यंत म्हणजेच हे सहा सात दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे.

नक्की वाचा : ‘ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा’- गोपीचंद पडळकर

राज्यात १५ डिसेंबरनंतर पुन्हा पावसाची शक्यता (Weather Update)

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात थंडीचा जोर वाढणार असून राज्यातील कमाल आणि किमान तापमान लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे. पण,१४ तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असा अंदाज आहे. राज्यात १५ डिसेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बिघडण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार,असा अंदाज हवामान पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.

नक्की वाचा : ‘आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं’;विखेंकडून श्रद्धांजली

राज्यात १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता (Weather Update)

आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार १० डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्या तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. १० डिसेंबरनंतर तिथेही वातावरण निवळेल असे खुळे म्हणाले. 

पुढील १० दिवसातील पहाटे पाचचे किमान व दुपारी तीनचे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान १० ते १२ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते. दरम्यान, सध्या राज्यातील सर्वच ठिकाणी वातावरणात बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी राज्यातील काही भागात पावासनं देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले होते. मात्र,सध्या पावसानं वातावरण निवळंल आहे. थंडीचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here