Colors Marathi New Serial:’कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका; पहिली झलक आली समोर  

'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

0
Colors Marathi New Serial:'कलर्स मराठी'वर येणार नवीन मालिका; पहिली झलक आली समोर  
Colors Marathi New Serial:'कलर्स मराठी'वर येणार नवीन मालिका; पहिली झलक आली समोर  

Colors Marathi New Serial : नगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडेतीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे ‘आई तुळजाभवानी'(Aai Tuljabhvani). याच आई तुळजाभवानीवर आधारित एक मराठी मालिका कलर्स मराठीवर (Colours Marathi) सुरु होत आहे.  

नक्की वाचा : अभिमानास्पद! सोन्याच्या शिक्क्यावर झळकला शाहरुख खान

‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला (Colors Marathi New Serial)

छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी जोरदार चढाओढ चालू असते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने टीआरपी वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये सगळ्या जुन्या मालिका बंद केल्या आहेत. टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना ऐतिहासिक त्यातही देवी-देवतांच्या मालिका, त्यांचा इतिहास जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर आता कलर्स मराठी वाहिनीने ‘आई तुळजाभवानी’ या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अवश्य वाचा : २० दिवसांनंतर पंढरीच्या विठूरायाला मिळणार आराम!

मालिका नेमकी केव्हा सुरू होणार ? (Colors Marathi New Serial)

अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची गाथा ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. मालिकेची पहिली झलक नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कलर्सने मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. केवळ याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. पहिल्याच टीझरमध्ये जबरदस्त व्हीएफएक्स पाहायला मिळत आहेत. या मालिकेवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here