The Rayat Sevak Co-operative Bank Ltd : रयत सेवक बँकेच्या चेअरमनपदी प्रशांत खामकर

The Rayat Sevak Co-operative Bank Ltd : रयत सेवक बँकेच्या चेअरमनपदी प्रशांत खामकर

0
The Rayat Sevak Co-operative Bank Ltd : रयत सेवक बँकेच्या चेअरमनपदी प्रशांत खामकर
The Rayat Sevak Co-operative Bank Ltd : रयत सेवक बँकेच्या चेअरमनपदी प्रशांत खामकर

The Rayat Sevak Co-operative Bank Ltd : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशांत खामकर (Prashant Khamkar) यांची आशिया खंडातील अग्रगण्य मानली जाणारी ‘दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Rayat Sevak Co-operative Bank Ltd), सातारा’ या बँकेच्या अहिल्यानगर शाखेच्या चेअरमनपदी (Chairman) बहुमताने निवड करण्यात आली आहे. एका माजी विद्यार्थ्याने त्याच विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा बजावत असताना बँकेच्या वरिष्ठ पदापर्यंत मजल मारल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

बहि:शाल विभागाचे व्याख्याते म्हणूनही ते कार्यरत

प्रशांत खामकर हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री कोळाईदेवी विद्यालय, कोळगाव येथे झाले. याच विद्यालयाचे ‘माजी विद्यार्थी’ असलेल्या खामकर यांनी पुढे याच शाळेत ‘उपक्रमशील शिक्षक’ म्हणून आपली ओळख निर्माण केली. ते केवळ शिक्षकच नव्हे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे व्याख्याते म्हणूनही ते कार्यरत आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

त्यांनी बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणली (The Rayat Sevak Co-operative Bank Ltd)

रयत बँकेचे ‘तज्ञ संचालक’ म्हणून काम करताना बँकेच्या कामकाजात त्यांनी नेहमीच पारदर्शकता आणि शिस्त आणली आहे. त्यांच्या याच अनुभवाचा विचार करून रयत सेवक बँकेने त्यांच्याकडे अहिल्यानगर शाखेची जबाबदारी सोपवली आहे. सरपंच पुरुषोत्तम लगड, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हेमंत नलगे, नितीन नलगे, चिमण बाराहाते, दादासाहेब लगड, प्राचार्य शहाजी हिरडे, पर्यवेक्षक दत्तात्रय मोरे, प्रशांत आढाव, राजू भापकर, संजय ठोकळ, माऊली गलांडे, संजय राऊत, मंजुश्री धीवर, सुवर्णा देशमुख यांच्यासह सहशिक्षकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.