Pune Zika Virus:पुण्यात झिकाचा धोका वाढला;रुग्णांची संख्या पोहोचली सातवर 

दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) संसर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या (Number Of patients) आता सातवर पोहोचली आहे.

0
Pune Zika Virus:पुण्यात झिकाचा धोका वाढला;रुग्णांची संख्या पोहोचली सातवर 
Pune Zika Virus:पुण्यात झिकाचा धोका वाढला;रुग्णांची संख्या पोहोचली सातवर 

Zika Virus : दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) संसर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या (Number Of patients) आता सातवर पोहोचली आहे. एरंडवणे येथील दोन गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे,अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी दिली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी

४६ वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचं निदान (Pune Zika Virus)

पुण्यात झिकाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला, याचे धागेदोरे आरोग्य यंत्रणेला सापडत नाहीत. त्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये ४६ वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचं निदान झालं आहे. त्यानंतर मुंढव्यातील एका ४७ वर्षांची एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचं निदान झाल्याचं समोर आलं आहे.

अवश्य वाचा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

पंढरपूर वारीच्या तोंडावर झिकाचे सात रुग्ण आढळल्यानं खळबळ (Pune Zika Virus)

दरम्यान, पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असल्याचं पाहायला मिळतंय. ऐन पंढरपूरच्या वारीच्या तोंडावर झिकाचे सात रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न अनुत्तरीत आहे.

झिका व्हायरसची लक्षणं –

ताप येणे 
सांधेदुखी
अंगदुखी
डोकेदुखी
डोळे लाल होणे
उलटी होणे
अस्वस्थता जाणवणे  
अंगावर पुरळ उठणे

काळजी कशी घ्यावी ?

डासांपासून दूर राहणे
घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
पाण्याची डबकी होऊ न देणे
पाणी जास्त काळ साठवून ठेवू नका
घर आणि परिसर स्वच्छ ठेवा
मच्छरदाणीचा वापर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here