नगर : शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी आज (ता.२६) जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीतून ठाकरेंनी जाहीर केलेल्या परांडा विधानसभेच्या जागेवरही उमेदवार घोषित करण्यात आलाय. सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर शहरातून अभिषेक कळमकर (Abhishek kalamkar) तर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे (Amit Bhangre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी बावीस उमेदवारांची यादी जाहीर (Sharad Pawar)
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज बावीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल,असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अवश्य वाचा : सुजयला जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट – शालिनी विखे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी (Sharad Pawar)
१. एरंडोल -सतीश अण्णा पाटील
२. गंगापूर -सतीश चव्हाण
३. शहापूर -पांडुरंग बरोरा
४. परांडा- राहुल मोटे
५. बीड -संदीप क्षीरसागर
६. आर्वी -मयुरा काळे
७. बागलान -दीपिका चव्हाण
८. येवला -माणिकराव शिंदे
९. सिन्नर- उदय सांगळे
१०. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
११. नाशिक पूर्व- गणेश गीते
१२. उल्हासनगर- ओमी कलानी
१३. जुन्नर- सत्यशील शेरकर
१४. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
१५. खडकवासला -सचिन दोडके
१६. पर्वती -अश्विनीताई कदम
१७. अकोले- अमित भांगरे
१८. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
१९. माळशिरस- उत्तमराव जानकर
२०. फलटण -दीपक चव्हाण
२१. चंदगड नंदिनीताई – भाबुळकर कुपेकर
२२. इचलकरंजी- मदन कारंडे
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (ता.२६) बावीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तम जानकर यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.