Sqid Game Season 2: आता कोरियन सीरिजचे चाहते असलेल्यांसाठी एक आनंदी बातमी समोर आली आहे. लवकरच लोकप्रिय कोरियन वेब सीरिज (korean web series) ‘स्क्विड गेम’चा (Sqid game Season 2) दुसरा सीझन भेटीस येत आहे. ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन कुठे आणि कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा : ‘सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही’- देवेंद्र फडणवीस
तीन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’ सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. तसेच या थ्रीलर वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला होता. पहिल्या सीझनमध्ये ९ भाग होते. या पहिल्या सीझनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १ ऑगस्टला ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. तसंच शेवटचा सीझन देखील कधी प्रदर्शित होणार, हे देखील समोर आलं होतं.
अवश्य वाचा : लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यासाठी नवऱ्यांना दारुडे करणार का?संजय राऊतांचा सवाल
‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन २६ डिसेंबरला होणार प्रदर्शित (Squid Game Season 2)
आता ‘स्क्विड गेम’चा दुसरा सीझन उद्या, २६ डिसेंबरला प्रदर्शित होतं आहे. त्यामुळे आता तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. या वेबसीरिजचं स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर मध्यरात्री ३ वाजल्यापासून होणार आहे.‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनचे सर्व सातही भाग एकत्र प्रदर्शित होणार आहेत. ही सीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्सच्या महिन्याच्या किंवा वर्षाच्या सब्सक्रिप्शनवर पाहू शकतात. या सीझनमध्ये नवीन रंजक ड्रामा पाहायला मिळणार आहे.
ली जंग-जे पुन्हा सेओंग गि-हूनच्या भूमिकेत झळकणार (Squid Game Season 2)
‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये ली जंग-जे पुन्हा एकदा सेओंग गि-हूनच्या भूमिकेत झळकणार आहे. खेळाडू क्रमांक ४५६चे यावेळी उद्दिष्ट हा धोकादायक खेळ कायमचा संपवणं हे आहे. यासाठी तो पुन्हा एकदा रेड आणि ग्रीन लाईट अशा अनेक नव्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. ‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक नवीन पात्र पाहायला मिळणार आहेत.