Pataal Lok Season 2:‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा;पोस्टर प्रदर्शित 

0
Pataal Lok Season 2:‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा;पोस्टर प्रदर्शित 
Pataal Lok Season 2:‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा;पोस्टर प्रदर्शित 

pataal lok Season 2 : ओटीटीवर प्रदर्शित झालेली ‘पाताल लोक’ (Pataal Lok) ही वेब सीरिज खूप लोकप्रिय ठरली होती. लवकरच या वेब सीरिजचा (Web series) दुसरा भाग येणार आहे. मे २०२० मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रभावी कथा,पात्रे, ग्रामीण भारतातील वास्तववादी चित्रण आणि बारकाईने मांडलेल्या तपशीलांसाठी प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळाली होती. दुसऱ्याचे सीझनचे एक पोस्टर प्रदर्शित (Poster Relese) करण्यात आले आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!अभिनेता अल्लू अर्जुनला अटक  

पोस्टरमध्ये नेमकं काय?(Pataal Lok Season 2)

‘पाताल लोक’ च्या दुसऱ्या सीझनच्या अधिकृत घोषणेमध्ये अभिनेता जयदीप अहलावतचा चेहरा वरून खाली अशा प्रकारे दाखवण्यात आला आहे.त्याच्या डोळ्याजवळ धारदार चाकू ठेवलेला असून त्यावर रक्ताचे डाग आहेत. या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.या वेब सीरिजच्या घोषणेच्या पोस्टमध्ये,“हातोड्याचा वापर करून इंटरनेट ब्रेक करणार आहोत,पाताल लोकचा नवा सिझन लवकरच येणार आहे” असं कॅप्शन दिले आहे. 

अवश्य वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू  

जयदीप अहलावतचा यशस्वी प्रवास (Pataal Lok Season 2)

‘पाताल लोक’च्या पहिल्या सीझनच्या यशामध्ये जयदीप अहलावतची भूमिका महत्त्वाची ठरली होती.समोर आलेल्या माहितीनुसार,पहिल्या सीझनसाठी त्याला फक्त ४० लाख रुपये मानधन मिळाले होते. मात्र, दुसऱ्या सीझनसाठी त्याचा पगार तब्बल ५० पटींनी वाढवून २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या सीझनसाठीची कास्ट अजून गुप्त ठेवण्यात आली आहे. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत (इन्स्पेक्टर हातीराम चौधरी) आणि इश्वाक सिंग (कॉन्स्टेबल अन्सारी) यांच्या भूमिकेत होता.

‘पाताल लोक’ची कथा तरुण तेजपाल यांच्या २०१० मध्ये आलेल्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या कादंबरीवर आधारित आहे. यात जयदीप अहलावत यांनी साकारलेला इन्स्पेक्टर हातीराम चौधरी एका उच्चस्तरीय खटल्याचा तपास करताना दिसतो, ज्यात एका पत्रकाराच्या अपयशी हत्येच्या कटामध्ये चार संशयित सामील असतात. तपासाच्या दरम्यान हातीराम गुन्हेगारी जगतात गुंतत जातो आणि भयावह सत्य उघड करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here