Asatana Tu Song:आई व मुलीमधील हळुवार नातं उलगडणार,’मायलेक’ चित्रपटातील’असताना तू’ गाणं प्रदर्शित

'असताना तू' या गाण्यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत याला लाभले आहे.

0
Asatana Tu Song
Asatana Tu Song

नगर : आई आणि मुलीच्या गोड नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक'(Maylek Movie) चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) आणि तिची मुलगी सनाया मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटातून रिअल लाइफ मधील एक आई व मुलगी आपल्याला एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरनंतर आता या चित्रपटातील पहिले गाणं ‘असताना तू’ हे नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे.

नक्की वाचा : लोकसभेमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या;नवीन तारीख जाहीर

‘असताना तू’ या गाण्यातून मायलेकींची मैत्री दिसणार (Asatana Tu Song)

‘असताना तू’ या गाण्यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत याला लाभले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील बॅाण्डिंग दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे.

हेही पहा : बापरे!उत्तर प्रदेशमध्ये दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या

१९ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार  (Asatana Tu Song)

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. ही आई आणि लेकीची सुंदर केमिस्ट्री आपल्याला १९ एप्रिलला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.  

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते,”अगदी खरं सांगायचे तर माझ्या आणि मायरावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे आम्हा दोघींना अगदी तंतोतंत जुळते. आमचे प्रत्यक्षात असेच गोड नाते आहे. कदाचित त्यामुळेच आमच्यातील ही केमिस्ट्री पडद्यावर नैसर्गिक दिसत असावी. गाणे रॉकिंग असल्याने रेकॉर्डिंगलाही प्रचंड धमाल आली. मुळात गाण्याची टीम अतिशय हॅपनिंग आहे. आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणारे हे गाणे आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here