Marathi Song:तारूण्यातील भावविश्व दाखविणारं ‘लाईफ म्हणजे नुसता गोंधळ’ गाणं प्रदर्शित

0
Marathi Song:तारूण्यातील भावविश्व दाखविणारं 'लाईफ म्हणजे नुसता गोंधळ' गाणं प्रदर्शित
Marathi Song:तारूण्यातील भावविश्व दाखविणारं 'लाईफ म्हणजे नुसता गोंधळ' गाणं प्रदर्शित

Marathi song : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महाविद्यालयीन जीवन (College Life) हा एक खास अविस्मरणीय कोपरा असतो. हॉस्टेलवर राहून शिक्षण घेणा-यांच्या बाबतीत तर ही जीवनाची पाठशाळा असते. कॉलेजमध्ये शिकणा-या प्रत्येकाच्या आयुष्यात हा काळ एका वेगळ्याच जाणिवेनं व गोंधळाने भारलेला असतो. याच विश्वाची ओळख करून देणारं ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातील ‘लाईफ म्हणजे गोंधळ नुसता’ (Life Mhanje Gondhal Nusta) हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

नक्की वाचा : ‘पुष्पा २’ चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली!

तारुण्यातील गोंधळ दाखवणार गाणं प्रदर्शित (Marathi Song) 

‘लाईफ म्हणजे गोंधळ नुसता’ या गाण्यातून तारुण्यातील ही संभ्रमावस्था नेमकी टिपण्यात आली आहे. संदीप सावंत दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पराग फडके यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला गायक पराग फडके आणि अन्य कलाकारांचा स्वरसाज लाभला आहे. ऋषिकेश ठाकूरदेसाई, चिराग कबाडे, रमण पुजारी, त्रिगुण पुजारी यांचे संगीत संयोजन आहे. या गाण्याच्या शब्दांमधून तरुणाईच्या ज्या भावना आहेत,त्या व्यक्त झाल्या आहेत. तरुण विश्वाचं दर्शन घडवत असताना आपल्याच जीवनातल्या अनेक प्रसंगांचं कोलाज आपल्यासमोर उभं करणारं हे गाणं आहे.

अवश्य वाचा : उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार  

चित्रपटात ‘हे’ कलाकार दिसणार  (Marathi Song) 

जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर,अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदी कलाकार या चित्रपटात आहेत. डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमध्ये, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा अर्थ सामावलेला असतो, हे सांगण्याचा प्रयत्न ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here