Ek Daav Bhutacha Movie:’एक डाव भुताचा’ चित्रपटातील ‘वाजणार गं गाजणार गं’ गाणं प्रदर्शित 

0
Ek Daav Bhutacha Movie:'एक डाव भुताचा' चित्रपटातील 'वाजणार गं गाजणार गं' गाणं प्रदर्शित 
 

नगर : मागील काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)अभिनीत ‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटात गायक अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte)आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील “वाजणार गं गाजणार गं” (Vajnaar Ga Gajnaar Ga) हे गाणं ऐकायला मिळणार आहे. हे गाणं सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे.  

नक्की वाचा : झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!

संदीप मनोहर नवरे यांनी केलं चित्रपटाचे दिग्दर्शन (Ek Daav Bhutacha Movie)

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने  ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

अवश्य वाचा : अनंत अंबानी यांची लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडावर नियुक्ती

 ‘एक डाव भुताचा’ चित्रपटात ‘हे’ कलाकार पाहायला मिळणार (Ek Daav Bhutacha Movie)

अभिनेता सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘एक डाव भूताचा’ या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांनी या पूर्वी अनेक हिट गाणी दिली आहेत. आता उत्तम शब्द, संगीत असलेल्या “वाजणार गं गाजणार गं” या गाण्याची त्यात भर पडणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here