Ek Daav Bhutacha:माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट,’एक डाव भुताचा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित    

0
Ek Daav Bhutacha:माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट,'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित    
Ek Daav Bhutacha:माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट,'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित    

नगर : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) ही जोडी पुन्हा एकदा ‘एक डाव भुताचा (Ek Daav Bhutacha)या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. स्मशानात जन्मलेल्या तरुणाची धमाल गोष्ट “एक डाव भुताचा” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

नक्की वाचा : आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

टीझरमध्ये नेमके काय ?(Ek Daav Bhutacha)

‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट येत्या ४ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. मकरंद आणि सिद्धार्थसोबतच अभिनेत्री मयूरी देशमुख देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भुताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. 

अवश्य वाचा : भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषण

संदीप नवरे यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Ek Daav Bhutacha)

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here