Me Honar Superstar 3:सुरांची जुगलबंदी रंगणार! मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं तिसरं पर्व येणार

मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमातून अनेक महाराष्ट्रातील अनेक छोटे गायक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वाचा पहिला भाग हा आषाढी एकादशीच्या दिवशी सुरु होणार आहे.

0
Me Honar Superstar 3:सुरांची जुगलबंदी रंगणार! मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं तिसरं पर्व येणार
Me Honar Superstar 3:सुरांची जुगलबंदी रंगणार! मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं तिसरं पर्व येणार

नगर : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या दोन्ही पर्वांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्वही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले  ४ ते १४ या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही परीक्षकांच्या भूमिकेत अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे (Aadarsha Shinde) पाहायला मिळतील.

नक्की वाचा : जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय व्हॅलेंटाईन डे ला घेऊन येणार ‘नखरेवाली’;पोस्टर प्रदर्शित 

१३ जुलैपासून हा कार्यक्रम सुरु होणार (Me Honar Superstar 3)

‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमातून अनेक महाराष्ट्रातील अनेक छोटे गायक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वाचा पहिला भाग हा आषाढी एकादशीच्या दिवशी सुरु होणार आहे. त्यामुळे विठुनामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. येत्या १३ जुलैपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता छोटे उस्ताद महाराष्ट्राला भेटायला येणार आहेत. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे तीन परिक्षांमध्ये टॉप बारा स्पर्धक विभागण्यात येणार आहेत.त्यामुळे स्पर्धकांसोबतच परिक्षकांमध्येही सुरांची स्पर्धा रंगताना दिसेल. छोटे उस्तादच्या मंचावरही सुरांचा उत्सव साजरा होणार आहे. प्रेक्षकांसाठी छोटे उस्तादचं हे नवं पर्व म्हणजे सांगीतिक पर्वणी असणार आहे.

अवश्य वाचा : राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी;हवामान विभागाचा अंदाज

‘स्पर्धक तीन परीक्षकांमध्ये विभागले जाणार’ (Me Honar Superstar 3)

या कार्यक्रमाविषयी सचिन पिळगांवकर म्हणाले की, मी होणार सुपरस्टारचं तिसरं पर्व सुरु होतंय, ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. याआधी देखील या मंचावर फुलं उमलली आहेत,ज्यांचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. यंदाच्या पर्वातही असाच सुगंध पसरवण्याचा प्रयत्न असेल. फक्त या पर्वातलेच नाही तर याधीच्या पर्वातील मुलंही आमच्या संपर्कात आहेत. त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. या मुलांना मोठं होताना पाहताना खूप आनंद मिळतो. या पर्वात स्पर्धक तीन परीक्षकांमध्ये विभागले जाणार आहेत. त्यांच्यावर पैलू पाडण्याचा आम्ही प्रयत्न करु. माझा आजवरचा अनुभव मी त्यांच्यासोबत शेअर करणार आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here