The thrill of cricket | एकविरा महिला क्रिकेटचा थरार सुरू; साडेचार हजार मुली व महिलांची उपस्थिती 

चांगल्या आहाराबरोबर व्यायाम अत्यंत महत्त्वाचा

0


The thrill of cricket : संगमनेर: एकविरा महिला क्रिकेटचा थरार (The thrill of cricket) आजपासून (ता.७) सुरू झाला आहे. यावेळी साडेचार हजार मुली व महिलांची उपस्थिती होती. एकविराच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमधून सर्वांनी आनंद घ्या. कारण ही ऊर्जा आपल्या कामासाठी वर्षभर टिकणारी असते. एकविराच्या या स्पर्धांमुळे तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोठे व्यासपीठ (Big platform) निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त क्रीडा महोत्सव 2026 च्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, एकविराच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, अजय फटांगरे,  प्रमिला अभंग, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, एकविराच्या शीला पंजाबी, डॉ. वृषाली साबळे, शर्मिला हांडे, प्राजक्ता घुले, आदिती खोजे, तपस्या देशमुख, सुरभी मोरे, वैष्णवी खेडलेकर, तृष्णा आवटी, डॉ. सुरभी असोपा, सुनिता कांदळकर, सुविधा आरसिद्ध यांच्यासह नगरसेविका व विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अवश्य वाचा- शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

चांगल्या आहाराबरोबर व्यायाम अत्यंत महत्त्वाचा (The thrill of cricket)

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजमाता जिजाऊ ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी ,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचा वारसा चालवणाऱ्या भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ही सर्व कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे .संगमनेर तालुक्यातील ही अनेक मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. अभ्यास करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा .याचबरोबर एकविराच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमधून खेळा आनंद घ्या. कारण की आनंद देणारी ऊर्जा वर्षभराच्या कामासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, चांगल्या आहाराबरोबर चांगला व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या स्पर्धा मुलींसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून देणारे आहे. 

नक्की वाचा- श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

संगमनेर तालुक्यातील मुलींनी तालुक्याचा लौकिक वाढवला (The thrill of cricket)

तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या विविध स्पर्धा परीक्षांमधून संगमनेर तालुक्यातील मुलींनी आपल्या तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. या सर्वांची कामगिरी आपल्यासाठी अभिमानास्पद असून संगमनेर मधून अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांना संधी देण्याचे काम एकविराच्या माध्यमातून होत असून मुलींच्या करियरसह शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून यावेळेस पाच दिवस या स्पर्धा चालणार असून सर्वांनी आनंद घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा जबरदस्त रहा असा सल्ला त्यांनी दिला.