नगर : कलर्स मराठी (Colours Marathi) वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंद्रायणी असं या मालिकेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. त्यामध्ये इंद्रायणीची भूमिका साकारणाऱ्या छोट्या इंदूची झलक सर्वांना पाहायला मिळाली. आता या मालिकेचे शीर्षकगीत (Title Song) रिलीज करण्यात आले आहे. या शीर्षकगीताला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
नक्की वाचा : मैत्रीचा अर्थ सांगणारे ‘कन्नी`मधील ‘यारा रे’ गाणे प्रदर्शित
अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय की, कोण आहे इंदू ? तर इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’. इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू. एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी. इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलं आहे. तिचं अस्सल आणि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूला भेटण्याची उत्कंठा प्रेक्षकांना लागलेली आहे.
अवश्य वाचा :आता ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा; भारत सरकारकडून ‘चक्षु’ पोर्टल लॉन्च
गायिका सावनी रवींद्र हिने गेले गायले ‘इंद्रायणी’ चे शीर्षक गीत (Indrayani Serial)
आता या मालिकेचं एक गोड शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलंय आणि इंदू इतकंच तेही लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. “गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं. पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं “ असे या शीर्षकगीताचे बोल आहेत. इंदूचं भावविश्व मांडणारं हे अर्थपूर्ण शीर्षकगीत प्रसिद्ध गीतकार आणि कवी दासू वैद्य यांनी लागलें असून तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केलंय. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने हे गीत गायलंय. हे गाणं कलर्स मराठीच्या फेसबुक पेजवर आणि युट्युबवर रसिकांना पाहायला मिळेल.
“इंद्रायणी” मालिकेत इंदूची भूमिका साकारणार साताऱ्याची सांची भोईर (Indrayani Serial)
“इंद्रायणी” मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ“ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. तर विनोद लव्हेकर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.‘जीव झाला येडापिसा’, ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती करत आहे. तर मालिकांचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर “इंद्रायणी”चे दिग्दर्शन करत आहेत. येत्या २५ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.