नगर : बॉलीवूड अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने (CISF Constable) थोबाडीत लगावली होती. गुरुवारी(ता.६) संध्याकाळी घडलेल्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. या प्रकरणी कुलविंदर कौर (Kulwindar Kaur) नावाच्या महिला सुरक्षारक्षकाला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका बिझनेसमनने कुलविंदर कौरला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा : सुनिता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा गगन भरारी!
काय म्हणाली होती कंगना ? (Kangana Ranaut Slapped)
काही दिवसांपूर्वी कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन झालं होतं. त्यासंदर्भात कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे नाराज असलेल्या कुलविंदरने विमानतळावर कंगनाच्या थोबाडीत लगावली. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाली होती. तसेच कंगनाने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. याच रागातून कुलविंदर कौरने कंगनाच्या थोबाडीत लगावल्याच म्हटलंय. याप्रकरणी कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे.
अवश्य वाचा : आनंदाची बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन
चंदीगढ विमानतळावर घडलेल्या या घटनेनंतर सोशल मीडियावर काही लोक कुलविंदर कौरला पाठिंबा देत आहेत, तर काही जण कंगना रणौतच्या बाजूने आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एका बिझनेसमनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कंगना राणौत यांना कानशिलात लगावल्याबद्दल सीआयएसएफ सुरक्षारक्षक कुलविंदर कौरला १ लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं झिरकपूर, मोहाली येथील व्यावसायिक शिवराज सिंह बैंस यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
कुलविंदर कौर काय म्हणाली ? (Kangana Ranaut Slapped)
या घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडीओत कुलविंदर म्हणते की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की त्या महिला १०० रुपयांसाठी आंदोलन करत होत्या. कंगना तिथे बसू शकल्या असत्या का? कंगना यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं, तेव्हा आपली आई तिथे आंदोलन करत होती, असं तिने म्हटलं.