Theft : नगर : नगरच्या माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीतील शंकर बाबा सावली मठातील दानपेटी रविवारी पहाटे चोरीला (Theft) गेली होती. याबाबत कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, कोतवाली पोलिसांनी तपास करत १२ तासांत आरोपी (Accused) ताब्यात घेतला आहे.
हे देखील वाचा : नगरच्या माेडी लिपी तज्ज्ञांनी शाेधली मनाेज जरांगेंची कुणबी नाेंद
कमलेश लक्ष्मण जंजाळे (रा. ब्राम्हण गल्ली, माळीवाडा, नगर) यांनी रविवारी (ता. ७) पहाटे तक्रार दिली की, पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञाताने माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीत असलेल्या शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचे दान असलेली दानपेटी चोरुन नेली होती.
नक्की वाचा : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार
या गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषन केले. त्या आधारे हा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला. चोरी करणारा व्यक्ती रावश्या असुन तो नेवासा तालुक्यतील माका येथील रहिवासी असल्याची अशी खात्रीलायक माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने रोहीदास (रावश्या) लक्ष्मण पलाटे (वय ३८, रा. माका, ता नेवासा) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवा उडविची उत्तरे दिली. त्यास प्राप्त सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच चोरलेली दानपेटी ही त्याने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दानपेटी हस्तगत केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहेत.