Theft : पारनेर : तालुक्यात चोरट्यांनी रविवारी (ता.१९) भरदिवसा धुमाकूळ घातला. एका दिवसात रांजणगाव मशीद ,चिंचोली, राळेगण थेरपाळ या गावांमध्ये घरफोड्या करत लाखोंचा ऐवज चोरट्याने चोरून (Theft) नेला. एरवी चोरटे रात्री घरफोड्या करीत, मात्र आता भर दिवसाही चोरटे घरफोड्या (Burglary) करू लागले आहेत. विशेष म्हणजे या घटना ज्या हद्दीत घडल्या त्या हद्दीत सुपा आणि पारनेर असे दोन पोलीस (Police) ठाणे कार्यरत आहेत.
हे देखील वाचा: ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे
चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान (Theft)
रात्रीच्या अंधारात चोरटे चोरांचा डाव साधायचे. मात्र, आता भर दिवसा रस्त्याकडची घरे लुटण्याची हिंमत चोरटे करू लागली आहेत. त्यामुळे भर दिवसा घरफोडी करून चोरटे पोलिसांनाच आव्हान देत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजणगाव मशीद गावच्या शिवारात अस्तगाव रोडवरील संदीप दत्तात्रय मगर यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. रविवारी सकाळी ११.३० ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी मगर यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पंचवीस हजाराची रोकड काढून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.
नक्की वाचा: यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
चोरट्यांचे धाडस वाढले (Theft)
पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राळेगण थेरपाळ गावच्या शिवारात चोरट्यांनी रविवारी दुपारी २ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घरफोडी केली. राळेगण थेरपाळ मधील नारायण गंगाराम डोमे यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा चोरट्यांनी तोडला व घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाखांचा ऐवजी या चोरून नेला. घरफोडीची तिसरी घटना चिंचोली गावच्या शिवारात सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. चिंचोली येथील अहिल्या विश्वनाथ पिंपळकर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्याने तोडले व घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.