Theft : कोपरगाव : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची रोकड लंपास झाल्याची घटना शिरपूर – पुणे (Pune) बसमध्ये येवला ते कोपरगाव दरम्यान घडली. ही महिला परीक्षेचा (Exam) पेपर देण्यासाठी जात होती व फी भरण्यासाठी आणलेले पैसे चोरीला (Theft) गेल्याने पेपरची वेळही निघून गेली आणि फीसाठी आणलेले पैसेही चोरीला गेल्याने महिलेला मोठा मनस्ताप झाला होता.
नक्की वाचा : सुपा एमआयडीसीतील टायर कंपनीला आग
साडेदहा हजार रुपये अज्ञात चोरट्यानी केले लंपास
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सासर असलेल्या शितल भिकाजी चौधरी या MCA चे शिक्षण घेत असून त्या लोणी येथे परीक्षेचा पेपर देण्यासाठी व सदर परीक्षेची बाकी असलेले फी चे जवळपास साडेदहा हजार रुपये बॅगमध्ये घेऊन शिरपूर-पुणे या बसने प्रवास करत असताना येवला ते कोपरगाव या दरम्यान त्यांच्या बॅगमधील साडेदहा हजार रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केले. सदर चोरीचा प्रकार शीतल चौधरी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत बस वाहक व चालकाकडे तक्रार केली व ती बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
अवश्य वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज
वर्ष वाया गेल्याची खंत (Theft)
शहर पोलीस ठाण्यात चौधरी यांना संशय असलेल्या त्या महिलेसह बसची झडती घेऊनही रोकड न मिळाल्याने बस पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. येवला ते कोपरगाव दरम्यान पैसे चोरी झाले असल्याची माहिती सदर महिलेने दिली. मात्र वेळेअभावी सदर महिलेचा पेपर मिस झाला. फायनल परीक्षा देता न आल्याने वर्ष वाया गेल्याची खंत व्यक्त करत महिलेने या घटनेबाबत मोठा संताप व्यक्त केला.