Theft : नगर : अहिल्यानगर शहरात महाशिवरात्रीच्या दिवशी व फेब्रुवारी महिन्यात चेनस्नॅचींगचे गुन्हे (Chain-snatchers) करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Police) काल (ता. २८) जेरबंद केले. अभिमन्यू विलास कुसळकर (वय २३, रा. बालाजीनगर, सोनई, ता. नेवासा) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. आरोपीला ताब्यात घेताच त्याच्या पत्नीने चोरीचे (Theft) दागिने पोलिसांना आणून दिले. त्याच्याकडून चोरीसाठी उपयोगी ठरलेली दुचाकी व चोरी केलेले दागिने असा दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अभिमन्यू विलास कुसळकर (वय २३, रा. बालाजीनगर, सोनई, ता. नेवासा), असे ताब्यात घेतल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी
सापळा रचून सोनई परिसरातून आरोपीस घेतले ताब्यात
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार अभिमन्यू कुसळकर याने त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सोनई परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अजय रुस्तम शिंदे (रा. कोठला, अहिल्यानगर) साथीदारासोबत चोरी केले असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अवश्य वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे
कोतवाली पोलिसांची कारवाई (Theft)
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल रोहीणी दरंदले, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, विशाल दळवी, संदीप पितळे, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, राम हंडाळ, राहुल गुंडु, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.