Theft : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दुचाकी चोरी (Theft) करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (ता. १५) जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सचिन देविदास दाने (वय २५, रा. नांदुर्खी रस्ता, शिर्डी, ता. राहाता), प्रसाद राजेंद्र रोटे (वय १९, रा. जानेफळ, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), गणेश भागीनाथ जगदाळे (वय २८, रा. जानेफळ, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर व एक अल्पवयीन मुलगा यांचा जेरबंद आरोपींत समावेश आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
छापा टाकत चार आरोपींना घेतले ताब्यात, एक पसार
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील दुचाकी चोरांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सचिन दाने हा चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता त्यांना पाच दुचाकी विक्रीसाठी आणल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले तर त्यांचा साथीदार सुरज गायकवाड हा पसार झाला आहे.
अवश्य वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!
६ लाख ४० हजाराच्या पाच दुचाकी हस्तगत (Theft)
पथकाने जेरबंद आरोपींकडून सहा लाख ४० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी मिरजगाव, राहाता, पुणे, येवला व शिर्डीतून या दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.