Theft : शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबवली; घटना सीसीटीव्हीत कैद

Theft : शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबवली; घटना सीसीटीव्हीत कैद

0
Theft : शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबवली; घटना सीसीटीव्हीत कैद
Theft : शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबवली; घटना सीसीटीव्हीत कैद

Theft : पाथर्डी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा मोटारसायकलची डिक्की फोडून चोरट्यांनी (Thieves) ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास (Theft) केली. ही घटना ११ जुलै रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे.

नक्की वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार

ठेवलेले रोख पैसे व कागदपत्रे गायब

ही चोरीची घटना सुभाष सखाराम घुले (वय ५८, सेवानिवृत्त शिक्षक, रा. काटेवाडी ता. पाथर्डी, सध्या रा. एकनाथनगर, पाथर्डी रोड, शेवगाव) यांच्यासोबत घडली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी शेतीच्या कामासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाथर्डी शाखेतून ५०,००० रुपये रोख रक्कम काढली होती. त्यानंतर ही रक्कम तसेच बँकेची चेकबुक, पासबुक आदी कागदपत्रे मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवून ते काही वेळासाठी ‘सी. एस. इंजिनिअरिंग सोल्युशन’ या दुकानात चौकशीसाठी गेले होते. परंतु, काही वेळाने परत आल्यावर त्यांनी पाहिले असता डिक्की उघडी होती आणि आत ठेवलेले रोख पैसे व कागदपत्रे गायब होती.

अवश्य वाचा : २९१ कोटीचा घोटाळा प्रकरणी अर्बन बँकेची ‘ईडी’कडून होणार चौकशी..!

संधी मिळताच डिक्की फोडून चोरी (Theft)

या घटनेनंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच हाती लागले नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, स्टेट बँकेपासूनच दुचाकीवर आलेले दोन संशयित व्यक्ती घुले यांच्यावर नजर ठेवून होते आणि संधी मिळताच त्यांनी डिक्की फोडून चोरी केली. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण मुख्य रस्त्यालगत आणि वर्दळीच्या भागात भरदिवसा ही चोरी झाली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास बटुळे हे तपास करत आहेत.