Theft : सावेडीत बांधकाम साईटवर चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

Theft : सावेडीत बांधकाम साईटवर चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

0
Theft : सावेडीत बांधकाम साईटवर चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा
Theft : सावेडीत बांधकाम साईटवर चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

Theft : नगर : शहरातील सावेडी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या साईटवर रात्रीच्या वेळी ४६ हजार रूपयांचे विद्युत वायर व ऑक्सिजन कॉपर पाईप चोरीस (Theft) गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

यांनी दिली फिर्याद

या प्रकरणी बद्रीनाथ यशवंत बेरड (वय ६०, रा. दरेवाडी, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा डॉ. आकाश बेरड व इतर सहकाऱ्यांनी मिळून मोहन माणिकलाल कुकरेजा यांचा सावेडी येथील प्लॉट पाच वर्षांच्या करारावर घेतला असून, या ठिकाणी हॉस्पिटलचे काम सुरू आहे. साईटवर तीन मजले असून, इंटीरिअर, पीयुपी, व इलेक्ट्रिक लाईटींगचे काम सुरु होते.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

विद्युत वायर व ऑक्सिजन पाईप चोरी (Theft)

या साईटवर नारायण गायकवाड व त्याचे कुटुंब वॉचमन म्हणून राहते. सर्व कामगार घरी गेले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साईटवर आले असता विद्युत वायर व ऑक्सिजन पाईप चोरीस गेल्याचे लक्षात आले. यामध्ये ४० हजार रूपये किमतीचे इलेक्ट्रिक कॉपर वायर, सहा हजार रूपये किमतीचे रूममधील १२ मीटर ऑक्सिजन वाहक कॉपर पाईप यांचा असा मुद्देमाल चोरी गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.