Theft : नगर : नेवासा (Nevasa) तालुक्यातील रांजणगाव देवी येथील मंदिरातील टाळ चोरी (Theft) करणारे दोघे नेवासा पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजू भगवान नागरे (रा. दादेगाव रोड, शेवगाव), संगीता सूर्यकांत सर्जेराव (रा. काटकर वस्ती, शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशियिताचे नावे आहेत.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २८ पितळी टाळ चोरी झाल्याबाबत अशोक बाबासाहेब चौधरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाचे चक्र फिरवत तसेच तांत्रिक विश्लेषण अनुसार आरोपींचा मागावा काढला. त्यानुसार पथकास सूचना देऊन शेवगाव येथील एक रिक्षा चालकासह एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, खाकीचा धाक दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न
सिद्धेश्वर भजनी मंडळाकडे टाळ सुपूर्द (Theft)
त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून सिद्धेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष अशोक चौधरी, अशोक रोडगे, नानासाहेब चौधरी व सारंगधर वाकचौरे यांच्याकडे सुपूर्द केला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, गणेश जाधव व अमोल साळवे यांच्या पथकाने केली.