Theft : नगर : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील (Ahilyanagar-Chhatrapati Sambhajinagar Road) शेंडी येथे असलेले एक मोटर्स शोरुम फोडणाऱ्या तीन सराईत आरोपींना (Accused) एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) काल (ता. ८) जेरबंद केले.
नक्की वाचा : संतप्त नागरिकांनी पुकारले दशक्रिया विधी आंदोलन
चोरी केलेले साहित्य हस्तगत
ह्रतिक दाऱ्या चव्हाण, सुंदर नितीन काळे व संजय दाऱ्या चव्हाण (तिघेही रा. काळामाथा, गजराज नगर, अहिल्यानगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले व चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन मोठे आंदोलन; 18 आंदोलकांचा मृत्यू
जेरबंद तीनही आरोपी सराईत गुन्हेगार (Theft)
शेंडीतील मोटर्स शोरुम फोडून चोरी केल्याची फिर्याद गुरुवारी (ता. ४) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना या घटनेबाबत माहिती मिळाली की, ह्रतिक चव्हाण व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पथकाने तीनही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, घरफोडी करण्यासाठीचे साहित्य हस्तगत केले. जेरबंद तीनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यातील ह्रतिक चव्हाणवर यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन, संजय चव्हाणवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक तर सुंदर काळेवर कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.