Theft : महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारे गडाआड

Theft

0
Theft : महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारे गडाआड
Theft : महावितरणच्या ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारा चोरणारे गडाआड

Theft : नगर : कर्जत तालुक्यातील शिंदे गावात असलेल्या तुकाई चारीच्या लिफ्टमधील ट्रान्सफार्मच्या तांब्याच्या तारा व ऑईल चोरणाऱ्या (Theft) सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. जेरबंद आरोपींकडील (Accused) चार लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: अकोले तालुक्याचे ‘अगस्तिनगर’ नामांतर करा : सदगीर

२५ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरी

शिंदे गावातील ट्रान्सफार्ममधील तांब्याच्या तारा व ऑईल चोरीला गेल्याची फिर्याद दीपक शिंदे यांनी २२ सप्टेंबरला कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार २५ लाख ७२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासासाठी पथक नियुक्त केले.

नक्की वाचा : महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पथकाने शिंदे गावात जाऊन घेतली माहिती (Theft)

तसेच रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना गुप्त माहिती मिळाली की, नवसरवाडी (ता. कर्जत) येथील मच्छिंद्र रामदार काळे (वय ५०) व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केली आहे. त्यानुसार पथकाने नवसरवाडीत मच्छिंद्र काळे याच्या घराला वेढा देत त्याला व त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले. त्याचे तीन साथीदार मात्र पसार झाले. मच्छिंद्र काळे, सागर मच्छिंद्र काळे  (वय १९), श्याम विष्णू पवार (वय २६), विष्णू सरदार पवार (वय ६५, सर्व रा. नवसरवाडी, ता. कर्जत), किशोर खेलू पवार (वय ४५, रा. माडी, ता. जि. सोलापूर), राजकुमार मधुकर भोपळे (रा. ढोकी, ता. जि. धारशिव), अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार सचिन विष्णू पवार, शिवाजी विष्णू पवार (दोघे रा. नवसरवाडी, ता. कर्जत) व प्रवीण पवार (रा.शिर्डी बाजारतळ, ता. राहाता) हे तिघे पसार आहेत. त्यांचा शोध पथक घेत आहे. 

पथकाने जेरबंद आरोपींकडून चार लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जेरबंद आरोपींपैकी किशोर पवार हा सराईत आरोपी आहे. त्याच्यावर सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांत घरफोडी व चोरीचे १३ गुन्हे दाखल आहेत. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.