Theft : १५ तोळ्याच्या दागिन्यांची चोरी; माळीवाडा ते तारकपूर बस स्थानकादरम्यान घडली

Theft : १५ तोळ्याच्या दागिन्यांची चोरी; माळीवाडा ते तारकपूर बस स्थानकादरम्यान घडली

0
Theft : १५ तोळ्याच्या दागिन्यांची चोरी; माळीवाडा ते तारकपूर बस स्थानकादरम्यान घडली
Theft : १५ तोळ्याच्या दागिन्यांची चोरी; माळीवाडा ते तारकपूर बस स्थानकादरम्यान घडली

Theft : नगर : बस प्रवासादरम्यान एका अनोळखी महिलेने बॅगमधील सुमारे १५ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून (Theft) नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) सोमवारी (ता. ६) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. सुहासीनी पंडीत आडोळे (वय ४८, रा. पोलीस कॉलनी, नंदनवननगर, बोल्हेगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

अवश्य वाचा : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; ‘राष्ट्रवादी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन

स्कार्फ बांधलेली अनोळखी महिलेवर संशय

फिर्यादी हे पती पंडीत यांच्यासह २ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे मुलगा प्रशांत व सुन प्रिती यांच्याकडे भेटीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी मुलाने त्याच्या जवळील सोन्याचे दागिने आईकडे दिले होते. यानंतर फिर्यादी रविवारी (ता. ५) पहाटे सहा वाजता पतीसमवेत बसने सोलापूरहून अहिल्यानगरकडे येत असताना, सकाळी माळीवाडा बस स्थानक येथे थांबली. त्यावेळी तोंडाला स्कार्फ बांधलेली अनोळखी महिला बस मध्ये चढली. त्या महिलेने मळमळ होत असल्याचे सांगत फिर्यादींच्या पतीला आपली जागा मागितली. त्यामुळे पतीने तिला जागा दिली आणि ती फिर्यादींच्या शेजारी बसली.

नक्की वाचा : किसान सभेसह विविध संघटनांची शुक्रवारी आंदोलनाची हाक

८ लाख ४० हजारांचे दागीने चाेरी (Theft)

थोड्याच वेळात, म्हणजे बस तारकपुर बसस्थानकावर पोहोचताच ती महिला घाईघाईने बसमधून उतरली. त्यानंतर फिर्यादी आपल्या घरी परतल्यानंतर बॅग तपासली असता, सर्व सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याचे आढळून आले. चोरी गेलेला मुद्देमाल सुमारे ८ लाख ४० हजार रुपायांचा असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.