Theft : सोन्याच्या दुकानामध्ये हातचलाखीने दागिने चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

Theft : सोन्याच्या दुकानामध्ये हातचलाखीने दागिने चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

0
Theft : सोन्याच्या दुकानामध्ये हातचलाखीने दागिने चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद
Theft : सोन्याच्या दुकानामध्ये हातचलाखीने दागिने चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

Theft : नगर : दिपावली सणाच्या (Diwali Festival) वेळी गर्दीचा फायदा घेऊन सोन्याच्या दुकानामध्ये (Gold Shop) हातचलाखीने दागिने चोरी (Theft) करणारे महिलांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी करण्याची घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे

४९ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

शांताबाई राधाकिसन जाधव (वय ५५, रा. हिवरसिंगा, ता. शिरुर, बीड), निलावती लक्ष्मण केंगार (वय ५२, रा. मुर्शदपुर, ता. जि. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४९ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

बीड जिल्ह्यात महिलांचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत (Theft)

कर्जत येथील साई ज्वेलर्स दुकानात दोन अज्ञात महिलांनी दागिने खरेदी करण्याचे उद्देशाने येऊन दागिने पाहत असतांना हातचलाखीने दुकानातील चांदीचे दागिने चोरुन नेल्याची फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करत असता ही चोरी शांताबाई जाधव या महिलेने केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने बीड जिल्ह्यात महिलांचा शोध घेऊन महिलांसह मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, योगेश कर्डिले, महादेव भांड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांच्या पथकाने केली.