Theft : नागापूर परिसरात मंदिरात चोरी; गुन्हा दाखल

Theft : नागापूर परिसरात मंदिरात चोरी; गुन्हा दाखल

0
Theft : नागापूर परिसरात मंदिरात चोरी; गुन्हा दाखल
Theft : नागापूर परिसरात मंदिरात चोरी; गुन्हा दाखल

Theft : नगर : नगर-मनमाड महामार्गावर नागापूर एमआयडीसी (Nagapur MIDC) येथील सनफार्मा कंपनी (Sun Pharma Company) जवळ असलेल्या बिरोबा मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी (Theft) केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातून विविध साहित्य लंपास केले आहे. याबाबत मंदिराचे पुजारी संदीप अर्जुन भोर (वय ३९, रा. भोर वस्ती, नव नागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल

२८ हजारांच्या साहित्याची चाेरी

फिर्यादी हे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून घरी गेले होते. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास ते पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मंदिरात जावून पाहणी केली असता चोरट्यांनी मंदिरातील पितळी वस्तू, ध्वनीक्षेपक यंत्रणा, एलईडी लाईट असे २८ हजार ६५० रुपयांचे साहित्य चोरून नेले असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप

पोलीस पथकाची घटनास्थळी पाहणी (Theft)

या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पाहणी केली.