Theft : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील महावितरण (Mahavitaran) विभागाचे सबस्टेशन फोडून कॉपर वायरची चोरी (Theft) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
त्यांच्याकडून ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हुसेन रेहमत खान (वय ३८, रा. कडमेडी, ता. समशाबाद, जि. विदीशा, मध्यप्रदेश), समीम कमरअली खान (वय ३२, रा. कडमेडी, ता. समशाबाद, जि. विदीशा, मध्यप्रदेश), शकील लईस खान वय ३२, रा. ता. बेरसिया, जि. भोपाळ, मध्यप्रदेश), कासीम इदरीस खान (वय ३०, रा. महाराज खेडी, ता. सिरोज, जि. विदीशा, मध्यप्रदेश), शाहरुख साबीर खान (वय २३,रा. जिनीया, ता. भोपाळ, जि. भोपाळ), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
गुगल मॅपचे लोकेशनच्या आधारे कॉपर चोरी (Theft)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार गुगल मॅप वर महावितरण सब स्टेशन कोठे आहेत. त्याची माहिती घेऊन परिसराची पाहणी करून ही टोळी चोरी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही टोळी फक्त महाराष्ट्रात चोरी करण्याच्या उद्देशाने येत असल्याची खात्री झाली. त्यानुसार संशयित आरोपींनी खांडके (ता. जि. अहिल्यानगर) हा सब स्टेशन, २२० केव्ही कौडगाव, ता. जि. अहिल्यानगर येथील विंड वर्ल्ड लि. क., शेवगाव, नेवासा, सिन्नर, पारगांव या ठिकाणी असलेले एम.एस.ई.बी. सब स्टेशन मधून गुगल मॅपचे लोकेशनच्या आधारे कॉपर चोरी करत असल्याचे पोलीस तपासत समोर आले.
या टोळीने नाशिक, पुणे अहिल्यानगर या परिसरात चोरी केली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, विष्णू भागवत, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, अमोल आजबे, जालिंदर माने, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकाने केली.



