Theft : नगर : श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात चोरी (Theft) करणारे दोघे सराईत आरोपी (Hardened criminal) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने टाकळी ढोकेश्वर परिसरातून जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल १० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भास्कर खेमा पथवे (वय ५०,रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र ठकाजी उघडे (वय ३३, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा संजय भास्कर गावडे रा. नांदुरीदुमाला, ता. संगमनेर(पसार) याचेसह केला असल्याचे पोलीस तपासास समोर आले आहे.
अवश्य वाचा: कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल
खात्रीशीर माहिती नुसार कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हिंगणी परिसरात मंदिरात चोरी भास्कर पथवे याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे समजले. व तो त्याचेकडील चारचाकी वाहनातुन संगमनेर कडुन पारनेरचे दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने टाकळी ढोकेश्वर परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपय किमतीचा चांदीचा मुखवटा, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ८ हजार ४०० रोक रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १० लाख ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा: आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप
आरोपी विरुद्ध तब्बल १७ गुन्हे दाखल (Theft)
भास्कर पथवे हा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात तब्बल १७ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भिमराज खर्से, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे, योगेश कर्डिले, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



