Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास

Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास

0
Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास
Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास

Theft : पाथर्डी : श्री क्षेत्र मढी (Shri Kshetra Madhi) येथील कानिफनाथ यात्रेत काल (ता. ०८) लाखो नाथभक्तांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातचलाखीने पाकिटमारी, सोन्याचे दागिने व मोबाईल फोन, वाहने चोरल्याचा (Theft) अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) यात्रेकरुंनी चांगलीच गर्दी केली होती.

Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास
Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास

नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद

माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी

रंगपंचमीच्या दिवशी भरनाऱ्या या यात्रेसाठी एक दिवस आधीपासूनच राज्यासह विविध भागांतून लाखो भाविक मढीकडे दाखल होतात. पहाटे दर्शन घेऊन परतणारे आणि रंगपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी येणारे नाथभक्त मोठ्या संख्येने एकाच वेळी मढीत पोहोचल्याने पाथर्डी, मढी, करंजी, तिसगाव, निवडुंगे आदी मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. मढी गावातून पाथर्डी, तिसगाव, निवडुंगे, मायंबा आणि घाटशिरस या पाच प्रमुख मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची मोठी कसरत झाली. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. सकाळपासूनच गावातील रस्ते वाहनांच्या गर्दीने जाम झाले होते. पोलिसांनी वेळोवेळी वाहतूक नियंत्रणात आणत कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.

Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास
Theft : मढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, मोबाईल, रोकड लंपास

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

तक्रारी दाखल करण्यासाठी गर्दी (Theft)

दरम्यान, यात्रेतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक चोऱ्या केल्या. यामध्ये अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात भाविकांची गर्दी झाली होती.

दुचाकी चोरीचा प्रयत्न उधळला

छत्रपती संभाजीनगर येथील दिनेश देविदास उन्हे हे आपल्या मेव्हण्यासह मढी येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली होंडा शाईन मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी केली होती. दर्शन करून परत आल्यानंतर एक इसम त्यांची मोटारसायकल घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीस पकडले. यात्रेतील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गणेश भगवान तांदळे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) असे त्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.