Theft : कोपरगाव शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Theft : कोपरगाव शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

0
Theft : कोपरगाव शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास
Theft : कोपरगाव शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

​Theft : कोपरगाव : कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या मेन रोडवर चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घातला. खंदकनाल्याजवळील ‘मधु वाईन्स’ आणि ‘जिओ मार्ट’ ही दोन दुकाने फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास (Theft) केला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे. चोरासाेबत इतरही साथीदार होते का? याचा शोध पोलिसांनी (Police) घेण्याची गरज आहे.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

चाेरी करतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

​चोरट्यांनी अतिशय शिताफीने ही चोरी केली आहे. चोरी करताना कोणी पाहू नये म्हणून चोरट्याने शटर जवळ ड्रमला टेकून बोर्ड आडवा लावला आणि चोरी केली. गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मधुकर साखरे यांच्या ‘मधु वाईन्स’वर डल्ला मारला. कटरच्या साहाय्याने शटरचे लॉक ब्रॅकेट कापून एका चोरट्याने आत प्रवेश केला. ही सर्व दृश्ये दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तेथून चोरट्याने गल्ल्यातील रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या बाटल्या असा अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. तसेच ​मधु वाईन्स फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा समोरील नरेंद्र क्षत्रिय आणि अभिजीत मिश्रा यांच्या ‘जिओ मार्ट’ या मोबाईल शॉपकडे वळवला. येथे चोरी करण्यापूर्वी चोरट्याने अत्यंत हुशारीने दुकानातील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला, जेणेकरून पुरावा राहणार नाही. त्यानंतर दुकानातील १० ते १२ हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू असा अंदाजे अडीच ते तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.​कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोरांना तातडीने अटक करण्याची व्यापाऱ्यांची मागणी (Theft)

भरवस्तीतील दुकाने फोडल्याची माहिती मिळताच रात्रीच्या वेळी अनेक व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. “जर मुख्य रस्त्यावरील दुकाने सुरक्षित नसतील, तर आम्ही व्यापार करायचा कसा?” असा संतप्त सवाल व्यापारी विचारत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.


​कोपरगाव शहर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढत असून, शहरातील रात्रीची गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here