Theft : नगर : नगर शहरातील एसटी महामंडळाच्या (ST Corporation) तीन क्रमांकाच्या बस स्थानकात (पुणे बस स्थानक) चोरी (Theft) करणाऱ्या आरोपीला (Accused) कोतवाली पोलिसांनी (Police) आज ताब्यात घेतले. अभिषेक चंदन गागडे (वय २०, रा. फातिमा चर्च पाठीमागे, वाद्रापाडा, ता. अंबरनाथ, जि. पुणे) असे जेरबंद आरोपीचे नावे आहे.
हे देखील वाचा: मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद
पुणे बस स्थानकातून चोरी
शोभा सतीश मंडलेचा व सतीश मंडलेचा हे दाम्पत्य ४ फेब्रुवारीला एका लग्न समारंभासाठी नगर शहरात आले होते. लग्न समारंभ झाल्यावर सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ते पुणे बस स्थानकातून बसमध्ये बसत होत्या. यावेळी शोभा मंडलेचा यांच्या हातातील २ तोळे वजनाची सोन्याची एक पाटली चोरी गेली होती. या संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा: आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक
स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आरोपीला जेरबंद (Theft)
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल शाहीद शेख यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस निरीक्षक दराडे यांना माहिती मिळाली की, या प्रकरणातील आरोपी अंबरनाथ जि. ठाणे येथील आहे. त्यानुसार शाहीद शेख हे अंबरनाथला गेले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आरोपीला जेरबंद केले. त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणले असता त्याच्याकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीच्या नातेवाईकाने चोरीचे २० ग्रॅम सोने नगद स्वरुपात परत केले.