Theft : नगर : पारनेर तालुक्यातील पळशी येथे शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी (Theft) करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अनिकेत विलास हुलावळे (वय १९, रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) अशी जेरबंद आरोपींची (accused) नावे आहेत. त्यांचे तीन साथीदार मात्र, पसार आहेत.
हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
पळशी येथील प्रभाकर गागरे यांचे शेतमळ्यात घर आहे. दिवाळीत चोरांनी रात्री गागरे यांच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. सळईने घरातील व्यक्तींना मारहाण करत दोन लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईलचा समावेश आहे. या प्रकरणी गागरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.
नक्की वाचा : ‘शांतीकुमारजी फिरोदिया’ फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, पळशीतील जबरी चोरी अनिकेत हुलावळे व त्याच्या साथीदारांनी केली आहे. तो टाकळी ढोकेश्वर येथे आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून अनिकेतला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा कबीर काळे, अक्षय काळे (दोन्ही, रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा), साईनाथ जाधव (रा. घोसपुरी, ता. नगर) व गणमाळ्या चव्हाण यांच्या साथीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेतच्या साथीदारांचा तपास सुरू केला. त्यातील गणमाळ्याला जेरबंद करण्यात आले. तर उर्वरित तीन आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.