Theft of electric pumps | संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांमध्ये चोरट्यांनी विविध प्रकारच्या चोऱ्या सुरू होत्या. त्यात अलीकडल्या काळात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाला घातला होता. त्यात विहिरी, कुपनलिका, शेततळे यांना लक्ष करत केबल, कृषीपंपांच्या चोऱ्या (Theft of electric pumps) मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यात भोजदरीसारख्या दुर्गम भागातील एकट्या गावात शेकडो चोऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे भोजदरीकरांनी चोऱ्यांचा तपास लागून अवैध दारू बंद करण्यासाठी शिवजयंती दिनी आंदोलन करत माध्यमांसमोर व्यथा मांडल्या होत्या. चोऱ्यांचा तपास नाही लागला तर घारगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.
अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!
बेलापूर येथून साहित्य चोरी केल्याची कबूली (Theft of electric pumps)
त्यानंतर घारगाव पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे, अनिल देमाभाऊ काळे (सर्व रा.बाळंदरी) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली. त्यात दिपक भोर, राम गवांदे, रवींद्र गुंजाळ, भाऊ तळपे, गोरक्षनाथ कडाळे, उत्तम निमसे, संतोष निमसे, भास्कर गुळवे यांच्या केबल व नवनाथ सागर निलेश सागर रोहित आहेर सुरेश भुतांबरे महेश हांडे सुभाष गुळवे, सिताराम गुळवे, भरत पाबळे, लक्ष्मण तिटकारे, अमोल कहाने, सुभाष घोडे, शिवाजी उगले, रामदास भुतांबरे, संतोष शेळके यांचे कृषीपंप तसेच संदीप वाळुंज यांचा एलईडी टीव्ही, बेलापूर येथून ट्रॅक्टरची बॅटरी असे साहित्य चोरी केल्याची कबूली दिली व ते साहित्य विकले असल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने वरील सर्वांच्या ताब्यात असलेला मुद्देमाल जप्त केलाय. तर आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली.
नक्की वाचा- वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (Theft of electric pumps)
दरम्यान, चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या चोऱ्या करून तो माल शेतकरीच खरेदी करत असल्याने हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे बोलले जात आहे. तर ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबू गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके ,सुरेश शेळके, अनिल भांगरे ,महादेव हांडे, चांगदेव नेहे चालक चंद्रकांत मेढे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनाडआदिंनी ही कारवाई केली आहे. तर पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.



