Theft of jewelry : प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला; महिलांची टोळी जेरबंद

Theft of jewelry : नगर : एसटी बसमध्ये प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणाऱ्या (Theft of jewelry) तीन महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (मंगळवारी) जेरबंद केल्या.

0
Theft of jewelry : प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला; महिलांची टोळी जेरबंद
Theft of jewelry : प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला; महिलांची टोळी जेरबंद

Theft of jewelry : नगर : एसटी बसमध्ये प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणाऱ्या (Theft of jewelry) तीन महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (मंगळवारी) जेरबंद केल्या. या टोळीकडून दोन लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. छाया किसन भोसले (वय ५०, रा. माळीवाडा, नगर), जमुना संदीप काळे (वय २६, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), शीतल आदिनाथ भोसले (वय २२, रा. हातवळण, ता. आष्टी, जि. बीड) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.

हे देखील वाचा : धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण

तारकपूर बसस्थानक येथे २२ मे रोजी रुपेश गायकवाड हे आळेफाट्याला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना कोणी तरी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची चैन चोरून नेली. या संदर्भात त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

नक्की वाचा : कालव्‍यांची कामे रखडवून कोणती ‘निर्मिती’ साध्‍य करायची होती : राधाकृष्‍ण विखे पाटील

बसस्थानकांवरील वाढते चोरीचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी काल (सोमवारी) बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना काही बाबी निदर्शनास आल्या. त्यानुसार त्यांना माहिती काढली असता, बसस्थानकात चोरी करणाऱ्या तीन महिला चोरीचा ऐवज घेऊन तारकपूर बसस्थानकात आल्या असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दोन लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. या संदर्भात सखोल चौकशी केली असता तीनही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही चोरी नेवासा, जामखेड, पारनेर या ठिकाणी केल्याचे पथकाला सांगितले. त्यानुसार पथकाने आरोपी महिलांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या महिला आरोपींवर जिल्ह्यात यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here