ODI Cricket Rules:एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार

0
ODI Cricket Rules:एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
ODI Cricket Rules:एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार बदल,सामन्यात नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार

ODI Cricket Rules : क्रिकेट जगतात सध्या टी २० क्रिकेटची धूम आहे. मात्र टी २० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट काहीसं मागे पडत चाललं आहे. त्यामुळे आता कदिवसीय क्रिकेटची (ODI Cricket) रंगत वाढवण्यासाठी आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रांतीकारी बदलाची योजना बनवली आहे. दुबईत झालेल्या आयसीसी क्रिकेट समितीच्या (ICC Cricket Committee) बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नियम बदलण्याची (Rule Change) शिफारस करण्यात आली आहे. ज्यामुळे एकदिवसीय क्रिकेट रंगतदार होणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीत सौरभ गांगुली, महेला जयवर्धने, व्ही व्ही एस लक्ष्मण, शॉन पॉलॉक, डेनिअल व्हिटोरी, रॉजर हार्पर आणि जय शाह उपस्थित होते.

नक्की वाचा : अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ चित्रपट’या’ दिवशी होणार प्रदर्शित

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना मिळणार दिलासा (ODI Cricket Rules)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूचा वापर फक्त पहिल्या २५ षटकापर्यंत करता येईल,असा प्रस्ताव आयसीसीच्या समितीने दिला आहे. यानंतर उर्वरित २५ षटकासाठी केवळ एकच चेंडू वापरता येईल.आताच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्हीकडून नवी चेंडूचा वापर केला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूच्या वापराचा गोलंदाजांना फटका बसतो. फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी मिळते. आयसीसी समितीने केलेली शिफारस आयसीसीच्या सर्व सदस्य संघाच्या कर्णधारांना पाठवण्यात आली आहे. सर्व कर्णधारांची सहमती मिळाल्यास नव्या चेंडूचा नियम बदलण्यात येईल. जर २५ चेंडूपर्यंतच नव्या चेंडूचा वापर करण्याचा नियम आला तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांनाही पर्याय मिळेल. जुन्या चेंडूवर रिव्हर्स स्विंग करता येईल, तसंच फिरकी गोलंदाजांनाही याचा फायदा होईल.

अवश्य वाचा : खेड-शिवापूरमध्ये पाच कोटींची रक्कम जप्त;रोहित पवारांनी व्हिडिओ केला शेअर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बदल होणार? (ODI Cricket Rules)

नव्या चेंडूबरोबरच आयसीसी क्रिकेट समितीने पुढच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्याची शिफारसही केली आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका या देशांचे संघ अनेकवेळा दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतात. केवळ भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ तीन किंवा पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतात. त्यामुळे कसोटी क्रिकेटला बढावा मिळत नाही. आयसीसी क्रिकेट समितीने नाईट टेस्ट खेळवण्याचीही शिफारस केली आहे. सध्या केवळ ऑस्ट्रेलिया पिंक बॉल कसोटी सामना खेळला जातो. बीसीसीआयने गेल्या दोन वर्षांपासून पिंक बॉल कसोटी सामन्याचं आयोजन केलेले नाही. पिंक बॉल कसोटीमुळे अधिक प्रेक्षक स्टेडिअममध्ये येतील, असा विश्वास आयसीसी क्रिकेट समितीने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here