UPSC Exam System:मोठी बातमी! यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीत होणार बदल 

पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे त्यांच्यावर आरोप होत असतानाच यूपीएसससीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

0
UPSC Exam System:मोठी बातमी! यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीत होणार बदल 
UPSC Exam System:मोठी बातमी! यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीत होणार बदल 

Upsc Exam System :नगर : प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच यूपीएससीने (UPSC) त्यांची फसवणूक आणि तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. यासाठी आधार-आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन, उमेदवाराचं फेशियल रेकग्निशन व लाईव्ह आर्टिफिशियल इन्टेलिजन्स बेस्ड सीसीटीव्ही रेकग्निशन सिस्टिम आणण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे त्यांच्यावर आरोप होत असतानाच यूपीएसससीने हा महत्त्वाचा निर्णय (New Dicision) घेतला आहे.

नक्की वाचा : नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा

यूपीएससी करणार मोठा बदल (UPSC Exam System)

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातून यूपीएससीने मोठा धडा घेतला आहे. नीट-युजी परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनेही ही प्रणाली स्वीकारली आहे. नवी प्रणाली सुरू करण्यासाठी यूपीएससीने तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. आयोगाने काढलेल्या निविदांमध्ये म्हटलं आहे की, आधार-आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन, उमेदवाराचं फेशियल रेकग्निशन व लाईव्ह आर्टिफिशियल इन्टेलिजन्स बेस्ड सीसीटीव्ही रेकग्निशन सिस्टिम हवी आहे. 

अवश्य वाचा : पुण्यात मुसळधार पाऊस;अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


आयोगाने म्हटलं आहे की परीक्षेचं वेळापत्रक, परीक्षेच्या ठिकाणांची तपशीलवार यादी, प्रत्येक ठिकाणी असलेल्या उमेदवारांची संख्या यूपीएससीद्वारे तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनीला दोन ते तीन आठवडे आधी प्रदान केली जाईल. तसेच यूपीएससी फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशनसह इतर गोष्टींसाठी उमेदवारांची नावं, हजेरी क्रमांक, फोटोसह इतर माहिती परीक्षेच्या सात दिवस आधी पुरवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here