Thief : नगर : ट्रकचे टायर व इतर साहित्य चोरणाऱ्या (Thief) टोळीला एमआयडीसी पोलिसांच्या (Police) पथकाने आज (ता. ८) जेरबंद केले. ओंकार ज्ञानदेव पवार (वय २५), शुभम जनार्धन जाधव (वय २१), मयुरेश श्याम मोरे (वय २२), सचिन महादेव शेळके (वय २५), फिरोज अनिस शेख (वय ३१) व दीपक सुभाष शिंदे (वय ३२, सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) अशी टोळीतील जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
ट्रकची सहा टायर व इतर साहित्य चोरीला
तामिळनाडूतील रामस्वामी मूर्ती यांच्या ट्रकचा ३० जूनला दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात ट्रकचा चालक व सिक्युरिटी गार्ड जखमी झाले होते. त्यावेळी अपघात झालेल्या ट्रकची सहा टायर व इतर साहित्य असा तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती फिर्याद (Thief)
या संदर्भात मूर्ती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.