
Thief : श्रीरामपूर : तालुक्यातील मातापूर येथील शेतकऱ्याचे २६ क्विंटल सोयाबीन चोरीला गेले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अपर पोलीस अधीक्षकांच्या (Additional Superintendent of Police) पथकाने कारवाई करत शेतकऱ्यांचे सोयाबीन, शेळ्या, मेंढ्या व बोकड यांची चोरी (Thief) करणारी टोळी गजाआड केली आहे. या टोळीने शेतकऱ्यांच्या १५ मेंढ्या, एक बोकड व एक शेळी चोरल्याचे पोलीस (Police) तपासात कबूल केले.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
२६ क्विंटल सोयाबीनची चोरी
हकीगत अशी की, विजय दिगंबर उंडे यांच्या मातापूर (ता.श्रीरामपूर) येथील जाळीचे कंपाऊडमध्ये असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेल्या एकुण ५३ गोण्यामधील १ लाख ४ हजार रुपये किंमतीची २६ क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबतचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याबाबत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहिती, तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती दिली. त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय यांचे पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी सागर गोरख मांजरे (वय २८, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर), गणेश रवींद्र शिरोळे (वय ४०, रा. मातापूर ता. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले व सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार दिलीप भिमा जाधव (वय २६), योगेश भुराजी भवर (वय २६, दोघे रा. सायखेडा ता. निफाड जि. नाशिक), प्रशांत मुरलीधर धात्रक (रा. तुळजाभवानी नगर, पंचवटी, नाशिक) (पसार) अशांनी मिळून केला असल्याचे सांगितले.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
६७ हजार ४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत (Thief)
आरोपींकडे चौकशी केली असता हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी प्रथमतः साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली. नंतर चोरीच्या रात्री उशीरा नाशिकवरुन आपल्या साथीदारांना वाहनासह बोलावले व शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेल्या. हे करत असताना चारचाकी वाहनाचा आवाज होऊ नये म्हणुन गाडी बंद करुन शेडपर्यंत लोटत घेवुन गेले व गाडीत गोण्या भरल्यानंतर चोरी करुन सोयाबीन व्यापाऱ्याला विकली. चार आरोपींना या गुन्ह्यात अटक करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले १९ क्विंटल २६ किलोग्रॅम सोयाबीन असा ६७ हजार ४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


