Thief : नगर: रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या कारमधून दीड लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी (Thief) पळविल्याची घटना एमआयडीसी (MIDC), बोल्हेगाव परिसरात घडली. याबाबत गोविंद राजू मालू (वय ३९, रा. कराचीवाला नगर, सर्जेपुरा, अ.नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
कारमधून रोकड असलेली बॅग पळविली
फिर्यादी यांचे एमआयडीसी परिसरात मालू पेंट्स ॲण्ड इंडस्ट्रीयल सप्लायर दुकान आहे. ते नगर-मनमाड महामार्गावर एमआयडीसी परिसरातील सोमवारी (ता. ८) रात्री कारने दुकानातून नगर शहराकडे येण्यास निघाले. बोल्हेगाव फाट्याजवळ आले असता त्यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. कारमध्ये त्यांनी दीड लाखांची रोकड असलेली बॅग तसेच २ मोबाईल ठेवलेले होते.
नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
पोलीस पथकासह घटनास्थळ परिसरात पाहणी (Thief)
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच पंक्चरचे दुकान असल्याने कारमधून उतरून त्या दुकानाकडे चालत गेले. तेथून परत आल्यावर त्यांना कारचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी रोकड असलेली बॅग पाहिली असता ती दिसून आली नाही. रोकड असलेली बॅग कारमधून पळविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत परिसरात पाहणी केली. मालू यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



