Thief : नागापूर एमआयडीसीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन कंपन्या फोडून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Thief : नागापूर एमआयडीसीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन कंपन्या फोडून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

0
Thief : नागापूर एमआयडीसीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन कंपन्या फोडून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
Thief : नागापूर एमआयडीसीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन कंपन्या फोडून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

Thief : नगर : नागापूर एमआयडीसी (Nagapur MIDC) परिसरात चोरट्यांनी (Thief) धुमाकूळ घातला असून, दोन मोठ्या कंपन्यांचे टाळे तोडून पाच लाख ६५ हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

कुलूप तोडून रोकड चोरली

महेश शशीकांत परीख (वय ५८, रा. सिध्दीविनायक कॉलनी, सावेडी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. परीख यांची एमआयडीसी परिसरातील डब्लू ६२ ए मध्ये मॅपसन इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्याशेजारीच ६३ ए मध्ये श्रीरूप इंडस्ट्रीज आहे. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळच्या दरम्यान चोरट्यांनी या दोन्ही कंपनीच्या मुख्य शटरचे आणि ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये उचकापाचक करून चोरट्यांनी मॅपसन कंपनीतून पाच लाख १० हजार रूपयांची रोकड चोरली. तसेच शेजारील श्रीरूप इंडस्टीज या कंपनीतून ५५ हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे.

अवश्य वाचा: अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले

उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण (Thief)

एकाच रात्री दोन कंपन्यांमध्ये झालेल्या या धाडसी चोरीमुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरटे पसार झाले असून, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या