Threat to life : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

Threat to life : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

0
Crime : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
Crime : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

Threat to life : नगर : खासगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तींनी पैसे वसुलीसाठी व्यापाऱ्याच्या घरात घुसून मुलाच्या डोक्याला पिस्तुल (Pistol) लावली. तसेच १५ लाख रुपयाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी (Threat to life) दिल्याची घटना स्वस्तिक चौक येथील गणेशवाडी व केडगाव येथे घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विविध पदांसाठी भरती

फिर्यादीस पैशांकरिता त्रास

कविता रमाकांत पराळे, सोहन सातपुते, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे व अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत हिमेश दिलीप पोरवाल (वय ३१, रा. गणेशवाडी, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी कविता रमाकांत पराळे व सोहन सुरेश सातपुते (दोघे रा. केडगाव) यांच्याकडून २६ लाख रुपये व्याजाने घेतले होते. याच्या बदल्यात त्यांनी वेळोवेळी ४९ लाख १ हजार ५०० रुपये रोख, ऑनलाईन व आरटीजीएसने परत केले होते. तरीही दोघे फिर्यादीस पैशाकरिता त्रास देत होते.

अवश्य वाचा : बनावट कागदपत्रे तयार करून लाटली शिष्यवृती; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलाला पकडून डोक्याला लावले पिस्तुल (Threat to life)

७ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कविता रमाकांत पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे व बाउंसर सारखे दिसणारे चार ते पाच अनोळखी फिर्यादीच्या घरात घुसले. यावेळी प्रणव याने फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा वियान याला पकडून त्याच्या डोक्याला पिस्तुल लावले व १५ लाख रुपये दे, नाहीतर इथेच ठार करतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.