Scholarships for girls:मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ

0
Scholarships for girls:मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ
Scholarships for girls:मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ

नगर : राज्य सरकारने मागील काही दिवसांत अनेक निर्णय घेतले आहेत. आता मुलींच्या भविष्यासाठी सरकारने त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत (Schorship For Girls)वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली. या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai phule scholarship scheme) अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ (triple increase) करण्यात आली आहे.

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार

शिष्यवृत्तीमध्ये वाढ किती? (Scholarships for girls)

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात ६० रुपयांवरून २५० प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज, विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी १०० रुपयांची रक्कम ही ३०० रुपये प्रतिमहा अशी वाढवण्यात आली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या

शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल? (Scholarships for girls)

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया काय आहे? यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या शिष्यवत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा किंवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा. या शिष्यवृत्तीमुळे शैक्षणिक प्रवाहात  मुलींचे गळतीचे प्रमाणे कमी होण्यास मदत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here