Tiger cup| नारायणगाव संघाने पटकावला टायगर चषक; घुलेवाडी संघ उपविजेता

घुलेवाडी संघ उपविजेता

0

Tiger Cup | संगमनेर: आमदार अमोल खताळ पाटील युवा मंच व बाबापॅटर्न निळवंडे आयोजित टायगर चषक (Tiger Cup) क्रिकेट स्पर्धेत नारायण गाव येथील आर जे ग्रुप क्रिकेट संघ विजेता तर घुलेवाड येथील क्रिकेट संघ उपविजेता ठरला आहे. तृतीय क्रमांक टाकळी ढोकेश्वरच क्रिकेट संघाने तर चतुर्थ क्रमांकाचे मंचर क्रिकेट संघाने पटकाविले आहे या चारही संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती चषक आणि रोख स्वरूपात बक्षीस (Reward) देऊन सन्मानित करण्यात आले
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ असे चार दिवस टायगर चषक क्रिकेट स्पर्धेचे आमदार अमोल खताळ पाटील युवा मंच आणि बाबा पॅटर्न निळवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीबाबा आहेर, निखिल बिडवे व आकाश गायकवाड यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या टायगर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. 

अवश्य वाचा- अहिल्यानगरच्या ‘या’ भागातील शेतकऱ्यांवर महावितरणच्या निर्णयाची कुऱ्हाड; दोनच तास मिळणार वीज

अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील १६ क्रिकेट संघांचा सहभाग (Tiger Cup)

या क्रिकेट स्पर्धेसाठी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील १६ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे ७१ हजार रुपयाचे बक्षीस आमदार अमोल भाऊ खताळ पाटील युवा मंचच्या वतीने देण्यात आले. हे बक्षीस नारायणगाव येथील आर जे ग्रुप क्रिकेट संघाने पटकाविले. शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांच्या वतीने द्वितीय क्रमांक ५१ हजार रुपयाचे बक्षीस घुलेवाडी क्रिकेट संघाने पटकाविले. भाजपचे नवनाथ कानकाटे यांच्यावतीने तृतीय क्रमांक ४१ हजार रुपयांचे बक्षीस निलेश कंट्रक्शन मंचर या संघाने पटकविले आणि भाजपचे आश्वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे आणि भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे यांच्यावतीने देण्यात आलेले चतुर्थ क्रमांकाचे ३१ हजार आणि चषक टाकळी ढोकेश्वर क्रिकेट संघाला देऊन गौरविण्यात आले.

नक्की वाचा- अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं

विजेत्या संघांना टायगर चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मान (Tiger Cup)

मॅन ऑफ द सिरीज , मॅन ऑफ द मॅच फायनल राजू पाटे, उत्कृष्ट गोलंदाज गणेश रोमन, उत्कृष्ट समालोचक अनिल बेलोटे, अंपायर म्हणून अमित पंडित व रवींद्र बर्डे यांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सरपंच शशिकला पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, बाबा पॅटर्न अध्यक्ष तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर, नवनाथ कानकाटे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दिघे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य वर्पे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष राजेंद्र वारे, मुख्याध्यापक रमेश निघूते, कुबेर बाजारचे संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय आहेर, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवनाथ आहेर, रवींद्र पवार, भाजप नेते विजय पठाडे , पप्पू धारणकर आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या संघांना टायगर चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.