Tilasmi Bahein Song:’हीरामंडी’मधील ‘तिलस्मी बाहें’ गाणं प्रदर्शित ;सोनाक्षीच्या अदांनी चाहते घायाळ

'हीरामंडी' या वेबसीरिज मधील दुसरे गाणे 'तिलस्मी बाहें' हे गाणे संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केले आहे.'तिलस्मी बाहें' मध्ये ज्या पद्धतीने कथा मांडण्यात आली आहे तेही कोैतूकास्पद आहे.

0
Tilasmi Bahein Song
Tilasmi Bahein Song

नगर : बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांची आगामी वेबसीरिज हीरामंडीमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं सकल बन रिलीज झाले होते. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता या चित्रपटातील दुसरं गाणं ‘तिलस्मी बाहें’ रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यातील सोनाक्षी सिन्हाच्या अदांनी मात्र चाहत्यांना वेड लावले आहे. या संपूर्ण गाण्यामध्ये सोनाक्षी सिन्हावरून नजर हटणार नाही.

नक्की वाचा :  ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’; नीलेश साबळे पुन्हा महाराष्ट्राला हसवणार

सोनाक्षीच्या अदांनी प्रेक्षकांचे वेधले लक्ष (Tilasmi Bahein Song)

xr:d:DAFvzVEvC2U:1449,j:1238913604589558797,t:24040311

‘हीरामंडी’ या वेबसीरिज मधील दुसरे गाणे ‘तिलस्मी बाहें’ हे गाणे संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केले आहे.’तिलस्मी बाहें’ मध्ये ज्या पद्धतीने कथा मांडण्यात आली आहे तेही वाखाणण्याजोगे आहे. संगीत आणि गाण्यासोबतच सोनाक्षी सिन्हानेही तिच्या कातिल अदा आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या गाण्यात सोनाक्षी सिन्हा एक आकर्षक व्यक्तिरेखा दिसत आहे. सोनेरी साडी, गळ्यात डायमंड नेकलेस आणि कुरळे केस या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हातात ड्रिंक आणि सिगारेट घेऊन मेळाव्याच्या मध्यभागी बसलेली दिसते. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोनाक्षीवरून आपली नजर हटणार नाही.

हेही पहा : भाजपला धक्का; खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत  

हीरामंडी वेबसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर (Tilasmi Bahein Song)

xr:d:DAFvzVEvC2U:1451,j:7980802246389063401,t:24040311

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिज ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. ‘या वेबसीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा सोबत मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख या देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्य यांच्यातील लढाई पाहायला मिळणार आहे. यासोबतच हिरामंडीमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची झलकही दाखवण्यात येणार आहे. हीरामंडी वेबसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

xr:d:DAFvzVEvC2U:1453,j:4740462312924699865,t:24040311

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here