Tipu Sultan : अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं; टिपू सुलतान मुद्द्यावरून  कुठे पुतळ्याला दुग्धाभिषेक तर कुठे दहन

0
Tipu Sultan : अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं; टिपू सुलतान मुद्द्यावरून कुठे पुतळ्याला दुग्धाभिषेक तर दहन
Tipu Sultan : अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं; टिपू सुलतान मुद्द्यावरून कुठे पुतळ्याला दुग्धाभिषेक तर दहन

Tipu Sultan : नगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर आता त्याचे पडसाद उमटत आहेत. अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) देखील हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा (Statement) निषेध करत टिपू सुलतान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावरून आता मुस्लिम समाज हा देखील आक्रमक झाला असून टिपू सुलतान यांच्या प्रतीकात्मक फोटोला दुग्धाभिषेक घालून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे टिपू सुलतान यांच्या मुद्द्यावरून अहिल्यानगर शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नक्की वाचा : हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली ‘त्या’ वक्तव्याची माफी

काही तरुणांकडून दुग्धाभिषेक

मंगळवारी (ता.१७) सकाळी अहिल्यानगर शहरांमध्ये देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून हर्षवर्धन सपकाळ व टिपू सुलतान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर या घटनेला काही तास उलटत नाही तोच मंगळवारी रात्री (ता.१८) अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या जवळच परिसरात टिपू सुलतान यांच्या फोटोला काही तरुणांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील देण्यात आल्या.

हे पहा : टिप्याने भारतात अनेकांचे धर्मांतर केले होते – संग्राम जगताप

अफवांवर विश्वास ठेवू नका (Tipu Sultan)

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धार्मिक घटनांवरून अहिल्यानगर शहर हे वादाचे केंद्रबिंदू बनू लागले आहे. यातच आता टिपू सुलतान मुद्द्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.