Tiranga : कोपरगावात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

Tiranga : कोपरगावात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

0
Tiranga

Tiranga : कोपरगाव : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा (Tiranga) अभियान राबवण्यात येणार आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियानास (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरवात झाली असून या अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोपरगाव (Kopargaon) नगरपालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

कोपरगाव नगरपालिका कार्यालयातून रॅलीस सुरवात

मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव नगरपालिका कार्यालयातून तिरंगा बाईक रॅलीस सुरवात करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती संभाजी महाराज चौक, एस.जी.विद्यालय, गांधीनगर अशी होत सदर रॅलीचा समारोप नगरपरिषद कार्यालयात करण्यात आला. बाईक रॅलीच्या सुरुवातीस तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण (Tiranga)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा ट्रिब्यूट, हर घर तिरंगा आणि ध्वजारोहण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या देशाविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमिसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. त्या सैनिकांचा गौरव व्हावा, त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी, याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावण्यात यावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here